अशीच
अशीच वाजे, अशीच विसरे
बिनमुद्द्याची पोकळ टाळी
अशीच दिसते, अशीच लपते
बिनउमजेची पांढरकवळी
अशीच लांबे, अशीच थांबे
बिनशब्दांची रेषा काळी
अशीच उमटे, अशीच सरते
बिनचिंतेची अठी कपाळी
अशीच येते, अशीच उडते
बिनवेळेची पेंग बावळी
अशीच जुडते, अशीच तुटते
बिनअर्थाची स्वप्नसाखळी