भुताटकी
उत्तररात्री मसणवटीला काळ्याकभिन्न आमोशीला
समंध, हडळी, मुंजे जमले, दिवट्यांचा हा खेळ चालला
एक मृतात्मा उठून बसला, पाही सभोती खेळ चालला
'द्या रे कोणी दिवटी ह्याला, हा तर आहे कालच मेला'
सार्या दिवट्या पुढे धावल्या, दिवट्यांची ही झुंबड उडते
मसणवटीची सर्व भुतावळ भुताटकीला नीट जागते