• Poems
    • Poem1
    • Poem2
    • Poem3
    • Poem4
    • Poem5
    • Poem6
    • Poem7
    • Poem8
    • Poem9
    • Poem10
    • Poem11
    • Poem12
    • Poem13
    • Poem14
    • Poem15
    • Poem16
    • Poem17
    • Poem18
    • Poem19
    • Poem20
    • Poem21
  • Photos
    • Photo1
    • Photo2
    • Photo3
    • Photo4
    • Photo5
  • More photos
    • Photo6
    • Photo7
    • Photo8
    • Photo9
    • Photo10
    • Photo11
    • Photo12
    • Photo13
    • Photo14
    • Photo15

 

ह्या  वाड्याच्या

 

ह्या वाड्याच्या परसामध्ये
भले दांडगे झाड वाढते
हिरवी कच्ची चिंच तयाची
गाभुळल्याविण पिकून जाते

ह्या वाड्याच्या अंगणामधे
पिसाट कुत्रे वाट रोखते
दंताळे थोबाड तयाचे
गुरगुरल्याविण चावा घेते

ह्या वाड्याच्या ओटीवरती
जुनीपुराणी बाज चिरकते
बाजेवरल्या दीर्घ जिण्याचे
मेल्यावाचुन पिशाच्च होते









Powered by Create your own unique website with customizable templates.