अवदसेचे गाणे
बैल बाई बैल
पोळ्याचा बैल
पोळ्याच्या बैलाला पोळीच नाही
माझ्यातल्या मीला चोळीच नाही
गहू बाई गहू
खांडव्याचा गहू
खांडव्याच्या गव्हाला गोणीच नाही
माझ्यातल्या मीला योनीच नाही
पावा बाई पावा
गोकुळचा पावा
गोकुळच्या पाव्याला कान्हाच नाही
माझ्यातल्या मीला पान्हाच नाही