डांकिणवसा
डांकीणीला झोका देऊ, वारा सुटण्यासाठी बाई
डांकीणीला न्हाउ घालुया, झरा वाहण्यासाठी बाई
डांकीणीची ओवी गाऊ, जाते फिरण्यासाठी बाई
डांकीणीला दिवा जाळुया, तेल राखण्यासाठी बाई
डांकीणीला लोणी भरवू, गायी जपण्यासाठी बाई
डांकीणीची ओटी भरुया, मळवट टिकण्यासाठी बाई