ते ते सारे
बैलाच्या तोंडावर फुलतो फेस असा जो दमछाकीचा
झाडाच्या बुंध्यास साचतो चीक असा जो दुखापतीचा
बोक्याच्या चालीस मारतो वास असा जो उनाडक्यांचा
काजूच्या बोंडात मावतो झोक असा जो झिंगचढीचा
कुसवाच्या माथ्यावर खिळतो डंख असा जो काचकुटीचा
विहिरीच्या पाण्यावर कुढतो भोग असा जो पानझडीचा-
ते ते सारे साठवून घे मेंदूच्या कप्प्याकप्प्याला
ते ते सारे आठवून घे वेडाच्या टप्प्याटप्प्याला