मरीआईची अंगाई
जो बाळा जो खोपटामधे, भिंतीपाशी पथारीवरी
नांगी मारिल विंचू जेव्हा, गोड बोलशिल 'आई, आई'
जो बाळा जो रस्त्याकाठी, धुरळ्यामध्ये उघड्यावरती
वेडे कुत्रे घेइल चावा, थोर अशी माझी पुण्याई
जो बाळा जो रानामध्ये, काट्यांवरती झाडाखाली
डसतिल अंगाला मधमाश्या, मोहरेल ममतेची लाही
जो बाळा जो नदीतटाला, चिखलामध्ये वार्यावरती
मगरीच्या दाढेत सुखाविल मरीआईची ही अंगाई