समंध रडतो पिंपळावर
आडवाटेला वळणापाशी जुन्यापुराण्या पिंपळावर
आतुरतेने चाहुल घेतो, टपला समंध फांदीवर
मत्त मल्ल वा पुष्ट पोळ कुणि, येइल जर का टप्प्यावर
तुडविन त्याला उभा आडवा, फेकुन देइन वार्यावर
दिवस लोटले, रात्री सरल्या, कुणी न फिरके वळणावर
वाट पाहुनि थकला, चिडला, समंध रडतो पिंपळावर