कोणी
शष्ठीच्या रात्री पुनवेची उधाणभरती ऐकिल कोणी
केसरातल्या वृक्षावरची घरटी मोजुन घेइल कोणी
गुलबक्षीच्या माळेमधला दोरा शोधुन काढिल कोणी
वांझेच्याही स्तनाग्रातुनी दूध चोखुनी घेइल कोणी
निर्वाताच्या शून्यामध्ये सूर आठवा लाविल कोणी
कवचाला ना तडा पाडता ब्रह्मांड्याला फोडिल कोणी