लाकुडफाटा
लाकुडफाटा असा डांबरट
रानामध्ये लपून बसतो
लाकुडफाटा असा बावळट
वाटेवरती पडून असतो
लाकुडफाटा असा आचरट
काट्या-धोंड्यांमधे लोळतो
लाकुडफाटा असा घाबरट
डोईवरती जपून बसतो
लाकुडफाटा असा हाव्ररट
रोज रॊज भाकरी भाजतो
लाकुडफाटा असा नागवट
कधीच ना शाळॆला जातो