बुध्दिजेवी
ही चष्म्यांची भिकार पंगत
आहे उच्छिष्टांना लंपट
जमिनीवरची शिते चाटते
ही चष्म्यांची भिकार पंगत
ही चष्म्यांची भिकार पंगत
इकडे-तिकडे डोळे फिरवी
मोजितसे जिलब्या दुसर्यांच्या
ही चष्म्यांची भिकार पंगत
ही चष्म्यांची भिकार पंगत
अर्बट-चर्बट काही खाते
शिळ्या कढीचे भुरके मारी
ही चष्म्यांची भिकार पंगत
राजदूत वाढाया आले
केशरपिवळा साखरभात
'भिक्षां देहि' लाळ गाळते
ही चष्म्यांची भिकार पंगत
द्रोण रिकामे हुंगत हुंगत
बरटलेली बोटे चोखत
सूज्ञपणाचा ढेकर देते
ही चष्म्यांची भिकार पंगत
नालस्त्यांचे श्लोक थुंकते
नवे-जुने ते वाद घालते
पाटावरती शौचा करते
ही चष्म्यांची भिकार पंगत