अडमुठे
रात्रीचा घनदाट रंग चढला
सारे दिवे लोपले
थोडा वेळ खळ्यात भुंकभुकले
कुत्रे पुन्हा झोपले
रात्रीचा घनदाट रंग चढला
पक्षी कुठे ना कळे
थोडा वेळ मळ्यात मंद फिरले
वारे पुन्हा थांबले
रात्रीचा घनदाट रंग चढला
काही कुठे ना हले
चिंध्यांचे बुजगावणे अडमुठे
शेतामधे जागते