तरी
कुणि न सोडल्या वार्यावरती तरी उडाल्या शुभ्र शेवर्या
कुणि न पाहिल्या रानामध्ये तरी लाजल्या पर्या बावर्या
कुणि न पेरल्या आडोशाला तरी उगवल्या पाउसछत्र्या
कुणि न मोजल्या घाटावरती तरी बुडाल्या दोन पायर्या
कुणि न हुंगल्या रेतीवरती तरी परतल्या लाटा खार्या
कुणि न शोधल्या अंगणामधे तरी हरवल्या गारा सार्या