मीच मी
हे निराळे मंत्र माझे
मीच मी घोकावयाचे
पेरणीच्या बारशाला
श्राध्द करतो पावसाचे
हे निराळे तंत्र माझे
मीच मी साधावयाचे
शत बळी चंडीस देतो
नेहरूंच्या कबुतरांचे
हे निराळे नेम माझे
मीच मी पाळावयाचे
सरबताला नित्य घेतो
लाल लिंबू चेटकाचे
हे निराळे मंत्र माझे
मीच मी घोकावयाचे
पेरणीच्या बारशाला
श्राध्द करतो पावसाचे
हे निराळे तंत्र माझे
मीच मी साधावयाचे
शत बळी चंडीस देतो
नेहरूंच्या कबुतरांचे
हे निराळे नेम माझे
मीच मी पाळावयाचे
सरबताला नित्य घेतो
लाल लिंबू चेटकाचे